धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप , मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानचा आगळा उपक्रम

Spread the love

धाराशिव :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने डीजे आणि गोंगाटी मिरवणुकीऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. धाराशिव शहरातील यशवंत नगर भागातील १० गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करून त्यांच्या आत्मनिर्भरतेला हातभार लावण्यात आला.

या उपक्रमाचा प्रारंभ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आला. त्यांनी स्वतःच्या हस्ते शिलाई मशिन वाटप करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लखन देशमुख, मार्गदर्शक अभिजीत देशमुख, धर्मराज सूर्यवंशी, अमित उंबरे, राम मुंडे, विश्वजीत देशमुख, अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष बिन्नी तावसकर, महेश सुरवसे, सोमनाथ गुरव, रमण जाधव, पंकज पाटील, ओंकार झोरे, आकाश भगत, निखिल देशमुख, शेखर घोडके, सागर वेदपाठक, श्रीराम शिंदे, अतुल ढोकर, स्वप्निल जाधव, अनुराग गाडेकर, लखन मुंडे, आदेश डक, राज लोमटे, अश्विन लिंगे, नाना महामुनी, राजाभाऊ ढेकणे, सुशांत लोंढे, शुभम सुरवसे, औदुंबर देशमुख, अंकुश, पृथ्वीराज मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाचा हेतू
मध्यवर्ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा निर्णय घेत समाजाला एक सकारात्मक संदेश दिला आहे. खर्च वाचवून गरजूंना मदत करत संभाजी महाराजांच्या विचारांना खरी मानवंदना दिली गेली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!