तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विकी चव्हाण यांची प्रबळ दावेदारी

Spread the love


धाराशिव – गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाची काल सोडत जाहीर झाली. ही सोडत जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांना उमेदवारीचे स्वप्न पडू लागली असून इच्छुकांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आरक्षणाची सोडत काहींना निराश करणारी असली तरी त्यांनी त्यातून आपला B plan तयार ठेवला असून त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आत्तापासूनच वातावरण तापवण्यास सुरुवात केली असून “यंदा फिक्स” व “भावी” असे बिरूद लावत सोशल वातावरण निर्मिती करताना दिसून येत आहेत.

तेरखेडा गट हा सर्वसाधारण गटासाठी राखीव सुटल्याने विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. तेरखेडा गटातून विकी चव्हाण यांना संधी मिळावी अशी त्यांच्या मित्रमंडळींची इच्छा असून त्यांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार धमाका करण्यास सुरुवात केली आहे.

तेरखेडा येथील विकी चव्हाण हे सर्व सामान्य घरातील एक व्यक्तिमत्व असून एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, धनंजय सावंत, प्रतापसिंह पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी कुस्तीच्या फडात अनेक मल्लांना “आसमान” दाखवले आहे. सर्वसाधारण कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असताना त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आपली ओळख निर्माण केली आहे तसेच दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख असून आज त्यांचा मित्रमंडळाचा मोठा वर्ग आहे. तसेच बड्या-बड्या राजकीय मंडळींसोबत त्यांची उठ बस असून त्यांची वेगळी ओळख आहे. माजी मंत्री तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या विजयात देखील विकी चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विकी चव्हाण यांना तेरखेडा जिल्हा परिषद गटातून संधी मिळाली तर या संधीचं नक्कीच सोनं होईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!