धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी आणि शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात दोन स्वतंत्र ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गावठी व देशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तामलवाडी पोलीस ठाणे कारवाई:
दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 8.10 वा. आरोपी आनंद रवी डोळसे (वय 29, रा. काटी, ता. तुळजापूर) याच्या घरासमोरून अंदाजे 3,500 रुपयांची 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
तसेच दुसऱ्या कारवाईत शहाजी नागनाथ क्षिरसागर (वय 51, रा. काटी, ता. तुळजापूर) याच्याकडून अंदाजे 4,000 रुपयांची 40 लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.
दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे कारवाई:
दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 1.30 वा. आरोपी अशोक माणिक कांबळे (झोपडपट्टी, शिराढोण) याच्याकडून अंदाजे 1,800 रुपयांची 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6.29 वा. राहुल सुरेश शेळके (वय 37, रा. खामसवाडी, ता. कळंब) याच्याकडून ऐश्वर्या हॉटेलजवळून 1,540 रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या 7 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या दोघांविरुद्धही महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.