उमरेगव्हाण गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

Spread the love



धाराशिव : तालुक्यातील उमरेगव्हाण गावचे उपसरपंच नागनाथ बोरगावकर, व ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश झाला.

धाराशिव खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर आणि जनतेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या सेवाभावावर विश्वास ठेवून  नागनाथ बोरगावकर, व ग्रा.स. दयानंद शिंदे यांनी पक्ष प्रवेश केला आहे..  आ. कैलास पाटील यांनी शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशामुळे उमरेगव्हाण गावात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून, ग्रामस्तरावर पक्षाच्या संघटन कार्याला नवी उभारी मिळाली आहे अशी प्रतिक्रिया आ.पाटील यांनी दिली आहे.

यावेळी सुजित हंगरगेकर, आण्णा तनमोर, दिनेश हेड्डा, माजी सरपंच दीपक पाटील, माजी सरपंच महेश कारभारी, अरुण कोळगे, राजाभाऊ नळेगावकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!