आंदोलनाचा धसका आश्वासन दिले 27 तारखेचे मात्र 23 तारखेला केली स्थळ पाहणी

Spread the love

शेतकऱ्याच्या शेतातील चलचित्र दर्शवणारी बातमी…

तुळजापूर :  तालुक्यातील गंजेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजे यांच्या शेताच्या जवळ बांधलेल्या पाझर तलावामुळे गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे 2014 पासून त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून ते शासन दरबारी हेलपाटे घालत होते मात्र त्यांना प्रशासनाकडून ठोस काहीच मिळत नव्हते जलसंधारण विभागाचे अधिकारी कधी त्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी सुद्धा आले नाही त्यांची ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्याकडे त्यांनी मांडली त्यानंतर मनोज जाधव यांनी जलसंधारण विभागाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला प्रारंभी निवेदन दिले त्यानंतर पादुका पूजन हे आंदोलन करण्यात आले आणि काल 22 मे रोजी देशी गाईचे गोमूत्र आणि शेण जलसंधारण अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी गेले असता जलसंधारण अधिकारी कार्यालयात नव्हते त्यामुळे त्यांनी कार्यालयात ठिय्या मांडत गेट बंद करून आंदोलन सुरू केले याच आंदोलनाचा धसका घेत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र लेखी लिहून दिल्याशिवाय आजचे आंदोलन स्थगित करणार नाही असे मनोज जाधव यांनी त्यांना फोनवर सांगितले त्यानंतर २७ मे रोजी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येईल असे लेखी पत्र सामाजिक कार्यकर्ते म्हणून जाधव यांना देण्यात आले मात्र आज 23 मे रोजीच त्यांनी ही स्थळ पाहणी केली त्यामुळे मनोज जाधव यांनी घेतलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. आंदोलनाचा यश मिळत असले तरी शेतकऱ्याला पूर्णपणे न्याय वेळेपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका प्रसार माध्यमाची बोलताना मनोज जाधव यांनी व्यक्त केली आहे.

मनोज जाधव यांनी केलेले पादुका पूजन आंदोलन..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!