हवामानावर आधारित फळपिक विमा योजना : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

Spread the love


धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका)  हवामान बदलामुळे फळपिकांना सतत धोका निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठी हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.जिल्ह्यासाठी अंबे बहारात द्राक्ष,मोसंबी,केळी,डाळिंब,आंबा व पपई या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी लागू असून,कर्जदार शेतकऱ्यांनी जर सहभाग नको असेल तर त्यासाठी नोंदणीच्या अंतिम तारखेच्या एक दिवस आधी बँकेकडे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यांचा सहभाग बंधनकारक समजला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवेळी पाऊस,कमी-जास्त तापमान,सापेक्ष आर्द्रता,वेगवान वारे व गारपीट अशा हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून त्यासोबत आधारकार्ड,७/१२ उतारा,फळबागेचे अक्षांश-रेखांश, फोटो व बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.

     विमा हप्ता व अंतिम मुदती

द्राक्ष – हप्ता ६३५० रुपये,अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५. मोसंबी – हप्ता नियमित१६५० रुपये अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर,डाळिंब -२६५० रुपये,केळी – २८५० रुपये, अंतिम दिनांक :३१ ऑक्टोबर २०२५.आंबा -२८५० रुपये.अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५.पपई -६५० रुपये.अंतिम दिनांक :३१ ऑक्टोबर २०२५ आहे.

       अधिसूचित महसूल मंडळे

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना : धाराशिव जिल्ह्यातील फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळे जाहीर केली आहे.

पपई – धाराशिव ग्रामीण, केशेगाव,कळंब,ईटकूर,येरमाळा, मोहा,शिराढोण,गोविंदपूर,तुळजापूर, सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ, जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग,आरळी बु., तामलवाडी,परंडा,आसु,जवळा नि., सोनारी,आनाळा,पाचपिंपळा, शेळगाव,भूम,वालवड,माणकेश्वर, अंभी,ईट,वाशी,तेरखेडा,पारगाव व पारा.आंबा पिकासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे समाविष्ठ आहे.

केळी पिकासाठी उमरगा, दाळीब,नारंगवाडी मुळज, मुरूम,बलसूर,बेडगा,धाराशिव शहर,धाराशिव ग्रामीण,बेबळी, केशेगाव,पाडोळी,तेर,ढोकी,जागजी, करजखेडा,येडशी,अंबेजवळगा,कळंब,ईटकूर,येरमाळा,मोहा,शिराढोण,गोविंदपूर,तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग,आरळी बु,तामलवाडी,परंडा, आसु,जवळा नि.,सोनारी,आनाळा, पाचपिंपळा,शेळगाव,भूम,वालवड, माणकेश्वर,अंभी,ईट,लोहारा, माकणी,जवेळी,धानुरी,वाशी, तेरखेडा,पारगाव,पारा.दाळीब पिकांसाठी उमरगा,दाळींब, नारंगवाडी,मुळज,मुरुम,धाराशीव शहर,धाराशीव ग्रामीण,बेंबळी, केशेगाव,पाडोळी,तेर,ढोकी,जागजी, करजखेडा,येडशी,अंबेजवळगा, कळंब,ईटकुर,येरमाळा,मोहा, शिराढोण,गोविंदपूर,मस्सा,नायगाव, तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.ईटकळ,जळकोट,मंगरूळ, नळदुर्ग,आरळी बु,तामलवाडी, परंडा,आसू,जवळा नि,सोनारी, आनाळा पाचपिंपळा,शेळगाव, भूम,वालवड,माणकेश्वर,अंबी, ईट,आष्टाा, लोहारा,माकणी, जेवळी,धानोरी,वाशी,तेरखेडा, पारगाव व पारा यांचा समावेश आहे.

द्राक्ष पिकासाठी उमरगा,दाळींब, नारंगवाडी,मुळज,मुरुम,धाराशीव शहर,धाराशीव ग्रामीण,बेंबळी, केशेगाव,पाडोळी,तेर,ढोकी,जागजी, करजखेडा,येडशी,अंबेजवळगा, कळंब,ईटकूर,येरमाळा,मोहा,

शिराढोण,गोविंदपूर,तुळजापूर, सावरगाव,सलगरा दि.ईटकळ, जळकोट,मंगरूळ,नळदुर्ग,आरळी बु, तामलवाडी,परंडा,आसू जवळा नि , सोनारी,आनाळा,पाचपिंपळा, शेळगाव,भूम,वालवड,माणकेश्वर , अंबी,ईट,आष्टा,लोहारा,माकणी, जेवळी,धानोरी,वाशी,तेरखेडा, पारगाव व पारा या महसूल मंडळांचा समावेश आहे.

मोसंबी पिकासाठी शिराढोण, तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ, नळदुर्ग,आरळी बु.,तामलवाडी, धाराशिव ग्रामीण,तेर,ढोकी,जागजी, परंडा,आसु,जवळा नि.,सोनारी, आनाळा,पाचपिंपळा,शेळगाव, माणकेश्वर,अंबी,वालवड,ईट,लोहारा,वाशी,तेरखेडा,पारगाव व पारा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचा समावेश असून, पपई,डाळिंब,मोसंबी व केळी उत्पादक बहुसंख्य महसूल मंडळात या योजनेचा लाभ घेता येईल.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे की,अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपले फळपिक हवामानाच्या जोखमीपासून सुरक्षित करावे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी www.pmfbsy.gov.in या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!