हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी ( रहे.) यांच्या उर्सानिमित्त शिवसेना ( शिंदे गट ) डॉक्टर सेल च्या वतीने आयोजित महाआरोग्यशिबीरास भरघोस प्रतिसाद

Spread the love

Dharashiv ( Osmanabad ) :

हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी ( रहे.) यांच्या 720 व्या उरूस निमित्त शिवसेना ( शिंदे गट ) डॉक्टर सेल च्या वतीने आयोजित धाराशिव शहरातील मदरसा दारुल उलुम शम्सीया मध्ये मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबीरास भरघोस प्रतिसाद मिळाला असून हातावर पोट असणाऱ्या गरजवंत जनतेचा हा भाग असुन आरोग्य सेवेची अत्यंत गरज या भागात होती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा समाजसेवेचा वारसा गरजु लोकांपर्यंत पोहोचवण्यात शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. धनंजय पडवळ सर हे यशस्वी झाले असुन या शिबीरात 750 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली, मोफत 50 चष्मे,सर्व ब्लड तपासणी मोफत करण्यात आली उल्लेखनीय बाब म्हणजे या शिबिरातील विविध आजाराने ग्रस्त 30 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत ,

मोतिबिंदू शस्त्रक्रिया साठी 65 रुग्ण, अँजिओग्राफी चे 7 रुग्ण, ह्रदय विकाराची 3 लहान बालके,40 नवीन शुगर विकाराचे रुग्ण या शिबीराचे उद्घाटन शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मौलाना जाफर अली खान यांनी हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी ( रहे.) यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली सदर शिबीरास शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, सुधीर अण्णा पाटील,जिल्हा युवासेना प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश अण्णा खापे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा अध्यक्ष नितीन आबा पाटील शहरप्रमुख सनी पवार जि. प. सदस्य आनंद तात्त्या पाटील जागजी तंटा मुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत अल्पसंख्यांक सेल जिल्हाप्रमुख जावेद शेख वाखरवाडी सरपंच नवनाथ सुरवसे सांजा युवा नेते बप्पा सूर्यवंशी गोवर्धन वाडी मा. सरपंच काकासाहेब खोत युवासेना तालुका प्रमुख संतोष जगदाळे , विजयभैया बारकुल, अजित कावळे आदी मान्यवर उपस्थित होते शहरप्रमुख सनी भैय्या पवार, सूर्यवंशी सावंत पाटील आदी पदाधीकारी यांनी भेट दिली सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सर्व डॉक्टर यांचा सत्कार या समयी करण्यात आला तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे फुल अँड फायनल ग्रुप, अ॓सीम ग्रुप, गाजी स्पोर्ट्स क्लब, समता यंग बाॅईज,जी.एम. ग्रुप, एम.एस ग्रुप, गालिब ग्रुप या सर्व मुख्य कार्यवाहकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला….


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!