स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त

Spread the love

स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त


Dharshiv :
दि. 17/05/26 मा.पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सो यांचे आदेशाने स्थागुशाचे पथक धाराशिव जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणे व अवैध धंदयावर केसेस करणेकामी रवाना होवुन पेट्रोलिंग करीत पथक येरमाळा येथे गेले असता पथकास गोपनिय बातमी मिळाली की वडजी शिवारात डोंगरामध्ये तलावाजवळ एका लिंबाचे झाडाखाली ताडपत्री झाकुन गुटख्याचे पोते कोणाला तरी विक्रीसाठी ठेवले आहेत व तेथे काही तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी येथील काही इसम थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती मा.पोनि सो यांना कळवल्याने पोनि श्री. विनोद इज्जपवार हे तात्काळ येरमाळा येथे गेले. तेथे पोस्टे येरमाळा येथील सपोनि श्री. भालेराव साहेब यांना बोलावुन घेवुन सर्व पोलीस स्टाफ हे माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचुन गेले असता तेथे लिंबाचे झाडाखाली ताडपत्री झाकुन त्यावर सात ते आठ इसम बसलेले होते. पथकास पाहुन सदरचे इसम पळुन जात असताना पथकातील पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला असता ते डोंगरामध्ये पळुन गेले त्यापैकी एका इसमास पकडले त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव छगन बिसराम शिंदे रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा असे सांगीतले त्यास लिंबाचे झाडाकडे घेवुन जावुन ताडपत्री खाली झाकुन ठेवलेल्या पोत्यामध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्यांने पोत्यामध्ये गुटखा आहे असे सांगीतले. नमुद गुटखा कोठुन आणला आहे असे विचारले असता त्याने तेरखेडा लक्ष्मी पिढी येथील काही इसम व मस्सा येथील एकजण यांचेसोबत मिळुन आणला आहे परंतु कोठुन आणला आहे ते पळुन गेलेले इसम यांना माहित आहे असे सांगुन पळुन गेलेल्या इसमाचे नावे सांगीतले ते सर्व लक्ष्मी पारधी पिढी येथील व मस्सा येथील एकजण असल्याचे सांगीतले. सदर ताडपत्री काढुन त्याखाली असलेल्या पोत्यापैकी वेगवेगळे दोन पोते फाडुन पाहिले असता एका पोत्यामध्ये राजनिवास गुटखा व एका पोत्यामध्ये सुगंधीत तंबाखु असा मुददेमाल दिसुन आला तो सर्व मुददेमाल व आरोपीचे तीन मोटारसायकल असा एकुण 62,48,060 /- रू.चा मुददेमाल जप्त करून नमुद आरोपीविरूध्द पोस्टे येरमाळा येथे गुन्हा दाखल करून ताब्यातील आरोपी छगन बिसराम शिदे रा.लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा यास पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोस्टे येरमाळा येथे हजर केले आहे.

सदरची धाडसी कामागिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि श्री. तात्याराव भालेराव पोस्टे येरमाळा, पोलीस हवालदार/विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोह / शोभा बांगर, चापोह/महेबुब अरब, रोहीत दंडनाईक, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!