हरिभाऊ घोगरे हायस्कूल उपळे (मा.) येथे येडशी बिटस्तर शिक्षण परिषदेचा उत्साही आयोजन

Spread the love

धाराशिव (उपळे मा.) – येडशी बिटस्तर शिक्षण परिषदेचे आयोजन हरिभाऊ घोगरे हायस्कूल, उपळे (मा.) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला शिक्षण अधिकारी श्री. नागेशजी मापारी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख शेषेराव राठोड सर यांच्या स्वागताने झाली. त्यांनी श्री. मापारी साहेबांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. यानंतर श्री. मापारी साहेबांनी उपस्थित सर्व शिक्षकांशी अत्यंत आनंदी आणि संवादात्मक वातावरणात चर्चा केली.

या प्रसंगी त्यांनी येडशी बिटमधील शिक्षकांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडाक्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. शाळांमधील विद्यार्थी केंद्रित उपक्रम, शिक्षकांचे योगदान यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दत्तप्रसाद जंगम, प्रकाशजी पारवे साहेब, केंद्रप्रमुख सरवदे सर, सुकेशनी वाघमारे मॅडम, बाळासाहेब शिंदे, श्रीपती जमाले, सुनीलजी चव्हाण, शेषेराव चव्हाण, रणजीत राजपूत, अमोल पांचाळ, रणजीत तुपारे, क्षीरसागर सर, आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, सचिन राठोड, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, श्री खंडू पडवळ, मल्लीनाथ कोणदे, विशाल राठोड, कैलास शानिमे, बालिका बोयणे आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!