हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण

Spread the love



हैदराबाद येथील श्री तुळजाभवानी देवींचे भाविक पटोला सबिथा इंद्रा रेड्डी यांनी आज श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार व ढाल अर्पण केली.

रेड्डी हे आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीला सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार आणि ढाल अर्पण करून श्री तुळजाभवानी देवी प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली.

मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!