हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा – संताजी चालुक्य

Spread the love

खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले…

हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा

– संताजी चालुक्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, धाराशिव

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.

मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस नोट bjp osmanabad , bjposmanabaddist@gmail.com वरुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद..

२० जानेवारी २०२४ ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची झालेली पत्रकार परिषद

आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील प्रतिक्रिया
  • परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
    Spread the loveपरभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार धाराशिव, दि. 11 –धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विश्वजित पवार यांची राज्य सरकारने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गुरुवारी अधिकृत आदेश जारी केला आहे.डॉ. विश्वजित गोविंदराव…
  • (no title)
    Spread the loveएमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाचीजबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्वीकारली धाराशिव : प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएसी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाºया प्रथमेश देशमुख याने बुधवारी (दि. ९) पुण्यात आत्महत्या केली. काँग्रेसचे…
  • धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
    Spread the love धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करून अल्लाहकडे दुवा करण्यात आली. ईदगाह कमिटीच्या…
  • पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
    Spread the loveवाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली आहेत. डोळ्यादेखत उभे पीक जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, पिकांसोबतच शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेली उत्पन्नाची आशाही जळून खाक झाली आहे.जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती.…
  • पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर  पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
    आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
    Spread the loveपावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर  पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी धाराशिव ता2: मराठवाड्यातील आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. यामुळं सोयाबीन या मुख्य पिकांसह इतर खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अशा सर्व भागातील पिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!