धाराशिव 9 मे (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी असे निर्देश राज्य मागासवर्ग आयेागाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व भटक्या जमाती ब संवर्गातील भोपे (पुजारी) यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या अडचणीचा आयोजित बैठकीत आढावा घेताना प्रा.डॉ.श्री.काळे बोलत होते.यावेळी राज्य मागासवर्ग आयेागाचे सदस्य डॉ.माऊली शिकारे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभिम शिंदे, उपविभागीय अधिकारी (धाराशिव) श्रीमती अरूणा गायकवाड, उपविभागीय अधिकारी (उमरगा) संजय पवार,उपविभागीय अधिकारी (कळंब) श्री. संजय पाटील,उपविभागीय अधिकारी (भूम)वैशाली पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांची प्रमुख उपस्थिती.
श्री.काळे म्हणाले,भोपे (पुजारी) बाबत जी पुराव्याची यादी आहे, त्याला प्रतिज्ञापत्र जोडावे, पवित्र पोर्टलवर संवर्गनिहाय पदभरतीची माहिती उपलब्ध करून द्यावी,बिंदू नामावली तपासून द्यावी,त्यानंतरच पदभरतीची पुढील कार्यवाही करावी,असे त्यांनी सांगितले.
श्री.अहिरराव म्हणाले,जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरावे दिल्यानंतरच कार्यवाही करता येईल आवश्यक ते कागदपत्रे तपासणी करूनच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र देतांना आवश्यक ते पुरावे सादर केल्यानंतरच प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे भूमच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती पाटील यावेळी म्हणाल्या.
तीन ते पाच महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात येतात त्यापेक्षाही कमी कालावधीतही प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त श्री.शिंदे यांनी दिली.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील एकुण 4703 प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी 4593 वैध, अवैध प्रलंबित 104 प्रकरणे होती.प्रकरणे अवैध ठरण्याची कारणे मुखत: मानिव दिनांकापूर्वीचे पुरावे व वंशावळ सिध्द करणारे पुरावे सादर केले नाही.संदिग्ध बनावट पुरावे सादर केले आहे. भटक्या जमाती व संवर्गातील भोपे (पुजारी) या संवर्गातील 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्रासाठी 51 प्रकरणे वैध ठरली आहेत.6 प्रकरणे प्रलंबित आहेत अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.
इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना उपविभाग निहाय दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत धाराशिव उपविभागात इतर मागास वर्ग या प्रवर्गातील 6074 जात प्रताणपत्र विशेष मागास प्रवर्गातील 236 जणांना,विमुक्त जाती प्रवर्गातील 877 जणांना, भटक्या जमाती प्रवर्गातील 2134 जणांना असे एकुण 9321 जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. भूम उपविभागतील वरील प्रमाणे 3272, उमरगा उपविभागात 3568,कळंब उपविभागात 4242 असे एकुण 20 हजार 403 जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.
याच प्रमाणे भटक्या जमाती प्रवर्गातील 89 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या प्रवर्गासाठी जिल्हयात नोंदी तपासण्यात आल्या. जिल्हयातील सर्व तालुक्यातील 117 गावात कुणबी नोंदी आढळल्या. या गावात 43 लाख 63 हजार 84 नोंदीची संख्या 4786 आहे.या सर्व नोंदीची स्कॅनींग करण्यात करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
















