धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा वापर करण्यात येत असून, हा मुरुम बिनपरवाना आणि अवैधरित्या उत्खनन करून आणल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचे चित्र असून, कारवाईऐवजी कंत्राटदाराला अप्रत्यक्षरित्या संरक्षण दिल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.
सदर महामार्गाच्या कामासाठी किती मुरुम लागतो, याचे अचूक गणित जिल्हा प्रशासनाकडे असताना देखील कुठून व किती मुरुम आणण्यात आला, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे हा मुरुम नेमका कुठून आणि कोणत्या आधारावर आणण्यात आला, हे मोठे कोडे ठरत आहे. आतापर्यंत झालेले उत्खनन, त्याचा वापर आणि साठवण याची कोणतीही मोजणी अद्याप जिल्हा प्रशासनाने केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या उत्खननाला काही अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याचे बोलले जात असून, परवानगीशिवाय उत्खनन सुरू ठेवण्यासाठी ‘सलाम’ संस्कृतीचा आधार घेतला जात असल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे हे ‘मुरुमायण’ कोणाच्या दिग्दर्शनाखाली सुरू आहे, याचा तपास आता गरजेचा बनला आहे.
सद्यस्थितीत कंत्राटदाराने उत्खनन केलेला मुरुम रस्त्यामध्ये वापरून “असे काही घडलेच नाही” असा आव आणण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु हे सगळे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात असूनही ठोस कारवाई का होत नाही, हा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
– अंतरसंवाद News




- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही




















