धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर आणण्यासाठी व्यापक लढा उभारला जाणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या वेळी राजकीय मतभेद व भूमिका बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.
बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी-बियाणे या गंभीर मुद्द्यांसह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर सरकार चालढकल करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. परिणामी, चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.
या विश्वासघातकी सरकारविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झाले.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर





















