भाजपाच करु शकेल धाराशिव शहराचा कायापालट – आ.राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

समता कॉलनी प्रभाग क्रमांक ९ येथे होणार अद्ययावत लेडीज जिम आणि विरंगुळा केंद्र..

   धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलून संपूर्णपणे कायापालट करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती नगरपालिकेचा कारभार सोपवावा, आपण पूर्ण ताकतीने निधी उपलब्ध करून देऊन शहरातील विकासकामे मार्गी लावू असे आवाहन आ राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. समता कॉलनी मधील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक कोटी रुपयांची अद्ययावत जीम आणि मुलांसाठी पन्नास लक्ष रुपयांचे विरंगुळा केंद्र या दोन्ही विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक कमलताई नलावडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी शहराध्यक्ष अमीत शिंदे, प्रभागातील माजी नगरसेवक तथा गटनेता युवराज बप्पा नळे, सौ सुनिता साळुंके यांच्यासह मधुकर तावडे, सुनील काकडे, सतीश दंडनाईक, ॲड अनिल काळे, विनोद गपाट, युवानेते सुजित साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना युवराज बप्पा नळे यांनी सांगितले की यापूर्वीच्या पालिकेच्या कारभा-यानी शहर संपूर्णपणे भकास करून टाकले असून आपल्या प्रभागासह संपूर्ण धाराशिव शहर एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल असे उत्तम विकासाचे नियोजन लोकनेते आ राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सक्षमपणे केले जाईल, त्यासाठी धाराशिव करांनी नगरपरिषदेचा सुकाणू भारतीय जनता पक्षाच्या हातात द्यावा असे आवाहन केले. राज्य शासनाकडून दीड कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ राणादादांचा समता कॉलनी व प्रभागातील नागरिकांच्या वतीने युवराज नळे, संदीप साळुंके, सुजित साळुंके, राजाभाऊ कारंडे, समर्थ हाजगुडे, निखिल शेरखाने, विनायक लोकरे, विनय माडजे, कैलास पानसे, वैभव मोरे, प्रथमेश दडपे, सुनील अंबेकर, राघव शेरकर, श्री शेरकर, रणजित रणखांब यांच्या हस्ते सन्मानपत्र, मानवस्त्र, पुष्पहार , श्रीफळ देऊन जाहीर नागरी सत्कार करून प्रभागाच्या वतीने आभार मानले. भूमीपूजन कार्यक्रमाला प्रभागातील जेष्ठ नागरिकांसह महिला पुरुष व युवांसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली महामुनी व सुवर्णा कांबळे यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!