एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय; महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा व विमा कवच जाहीर

Spread the love

 मंत्रालय, मुंबई | दि. ३ जून २०२५

राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यामुळे हजारो एस.टी. कर्मचाऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

 घोषित महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:

✅ ५३% महागाई भत्ता आता एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.

✅ ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ राबविण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती यांचा समावेश आहे.

✅ रु. ५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सेवा एस.टी. कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

✅ स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यात आले आहे.

अपघातात निधन झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास रु. १ कोटींपर्यंत विमा संरक्षण मिळणार.

✅ निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभरासाठी एस.टी. प्रवास मोफत पास देण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचाही आम्ही विचार केला आहे. हा निर्णय त्यासाठीच महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले की, “एस.टी. कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे.” यावेळी सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

#EknathShinde #PratapSarnaik #STKarmachari #MSRTC #TransportMinister #MaharashtraGovernment #STEmployeeWelfare


MSRTC News 2025, ST Employees Benefits, Maharashtra Government Decisions, Eknath Shinde Announcements, Pratap Sarnaik Transport Minister, ST Mahangai Bhatta, ST Medical Yojana, MSRTC Retirement Pass.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!