प्रतिनिधी
कळंब : ‘मुस्लिम समाजाने मुलींना शिक्षण देण्यास प्राधान्य द्यायला हवे’, असे मत पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी रविवारी कळंब येथील तालीम फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे. ‘तालीम से तरक्की’ या कार्यशाळेचे आयोजन तालीम फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक गौहर हसन, कुरने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रोफेसर मुबिन कुरने यांची उपस्थिती होती. तर मौलाना आझाद महामंडळाचे रिझवान पठाण, डॉ. साजिद चाऊस, शिक्षक अब्दुल माजिद काझी, मौलाना याहया, मौलाना आरिफ यांची उपस्थितीती होती. मुस्लिम समाजात शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचं आहे? 10 वी, 12वी नंतर काय करायला हवे? पालकांची असणारी भूमिका, शिष्यवृत्तीची माहिती, यावर चर्चा करण्यासाठी तालीमसे तरक्की म्हणजेच शिक्षणातून यश या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात गौहर हसन यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. ते म्हणाले मुलींनी आज शिक्षणावर भर दिला तर तुम्ही उद्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आहात. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी धाराशिवच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आमना शफाअत यांनी कशी मेहनत घेऊन युपीएससी पास केली, यावर प्रकाश टाकला. इतकंच नाही तर मोहंमद पैगंम्बरांनी शिक्षणाचे कसे महत्व सांगितले होते, हे देखील सांगितले.रिझवान पठाण यांनी मौलाना आझाद महामंडकडून शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे याबाबत मार्गदर्शन केले. तर प्रोफेसर कुरने यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, यावर भाष्य केले. त्यांनी देखील मुस्लिम समाजातील स्त्री शिक्षणावर भर दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालीम फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील























