
प्रतिनिधी, उस्मानाबाद (धाराशिव)
भारतीय सैनिकांच्या शौर्य व बलिदानाचा गौरव करण्यासाठी तसेच निष्पाप भारतीय पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उस्मानाबाद (धाराशिव) शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मार्ग, अजिंठा नगर चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावरून उत्साहात पार पडली.रॅलीचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते विकास बनसोडे यांनी केले.
या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद- कळंब विधानसभेचे उमेदवार ॲड. प्रणित शामराव डिकले,प्रा.विजय सिरसागर,मिलिंद रोकडे,रमेश गंगावणे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनचे नंदकुमार हावळे,विकास गंगावणे,अक्षय बनसोडे,समता सैनिक दलाचे सचिन दिलपाक,धम्माल शिंगाडे,संदिप बनसोडे तसेच सचिन गायकवाड,गौतम बनसोडे, बाळु रणखांब,रोहित बनसोडे,आकाश पांडागळे,अलंकार बनसोडे,शेखर बनसोडे,महादेव जोगदंड,विनोद बनसोडे,आशिष कांबळे,किरण धाकतोडे,आनंद गाडे,संतोष बनसोडे,नितीन कांबळे,विक्की सपकाळ,रवी सुरते इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी रॅलीच्या समारोपाला भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.