बागलकोट (कर्नाटक) :
दहावीच्या परीक्षेत अपयश आले तरीही निराश न होता, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा आदर्श दाखवणारी घटना कर्नाटकमधील बागलकोट येथे घडली आहे. अभिषेक चोळचागुट्टा या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत केवळ 200 गुण मिळाले आणि तो नापास ठरला. मात्र त्याच्या अपयशावर रडगाणं गाण्याऐवजी त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी वेगळा निर्णय घेतला.
अभिषेकच्या आई-वडिलांनी त्याच्यावर राग न काढता, उलट त्याच्या हातून केक कापून सेलिब्रेशन केलं. या अनोख्या साजशृंगारामागील उद्देश स्पष्ट होता – मुलगा नापास झाला असला तरी त्याचं मनोबल खच्ची न होता, त्याने पुढच्या वेळी नव्या उमेदीनं तयारी करावी.
अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं की, “अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आम्हाला त्याला दोष देण्यात वेळ वाया घालवायचा नव्हता, तर त्याला समजून घेऊन पुढील वाटचालीसाठी आधार द्यायचा होता.”
सध्या ही सकारात्मक दृष्टीकोन दाखवणारी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून अनेकांनी अभिषेकच्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे.
संपादन – अंतरसंवाद न्यूज
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
















