धाराशिव | समुद्रवाणी
लासोना येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे दौऱ्यावर असताना, समुद्रवाणी गावातील नागरिकांनी त्यांची भेट घेऊन स्थानिक प्रश्न मांडले.
गावात सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामाची गती संथ असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावर आ. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत काम वेगात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या रस्त्याच्या कामात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरत असून तो तात्काळ शिफ्ट करण्याची मागणी करण्यात आली. आमदार पाटील यांनी यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले.
तसेच, समुद्रवाणी ते बोरगाव राजे मार्गावरील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लासोना परिसरातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ व योग्य प्रकारे करावेत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
—
#समुद्रवाणी #धाराशिव #राणाजगजितसिंह_पाटील #रस्ता_काम #महावितरण #अवकाळीपाऊस #पंचनामा #शेती_नुकसान #धाराशिव_बातम्या
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव















