जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व इंटरनॅशनल जस्टीस मिशन( IJM) यांच्यावतीने विशेष सेल कामगार जागरूकता : असंघटित क्षेत्रातील योजना कार्यक्रम संपन्न

Spread the love

धाराशिव – विशेष सेल कामगार जागरूकता : असंघटित क्षेत्रातील योजना कार्यक्रम धाराशिव तालुक्यातील उपळा या गावातील उपळापाटी येथील दोन वीटभट्टी येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या शीला पठत, संदेश जोगेराव व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना, 2015 विशेष सेलचे सदस्य प्रशांत मते ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिवचे सुरज डांगे,यांनी कामगारांसाठी शासकीय योजनाची माहिती, कामगारांचे वेतन, कामगारांचा कामाचा वेळ, वेठबिगारी, मानवी तस्करी, कामगारासाठी ई श्रम कार्ड, बांधकाम कामगार कार्यालयातील योजना व बांधकाम कामगार कार्ड , मालकांकडून कामगारांचा छळ होत असेल तर किंवा कामगाराच्या अडचणीसाठी प्राधिकरण कायदेविषयक माहिती पॉम्पलेट महिला व पुरुष ,वृद्ध यांना वाटप करून, मोफत कायदेविषयक सेवा याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच कामगारांच्या अडचणी वेळी मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण टोल फ्री क्रमांक 15100 संपर्क करण्यास सांगितले, यावेळी असंघटित क्षेत्रातील कामगार , वीट भट्टी कामगार उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!