त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मानवंदना – भाजप युवा मोर्चा आयोजित वेशभूषा स्पर्धा

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) –
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवाच्या त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त त्यांचे कार्य व जीवनकार्य नव्या पिढीपुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजप युवा मोर्चा, धाराशिव यांच्या वतीने एक भव्य वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा येत्या २२ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता प्रतिष्ठान भवन, भाजप कार्यालय, राजे बाग, धाराशिव येथे होणार आहे. राजमातांच्या जीवनातून प्रेरणा घेत त्यांच्या वेशभूषेतून त्यांच्या योगदानाला मानवंदना देण्याचा हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.

स्पर्धेत ७ ते १५ वर्षे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार असून, दोन्ही वयोगटांतील पहिल्या ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे तालुका अध्यक्ष अजित खापरे (8605597309), शहर अध्यक्ष प्रसाद मुंडे (9623880166) व संयोजक ओंकार देवकते (8010266575) हे स्पर्धेच्या तयारीसाठी कार्यरत आहेत.

‘इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करा आणि राजमातांच्या कार्याची प्रेरणा घ्या’, असे आवाहन आयोजकांनी सर्वांना केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!