धाराशिव, दि.२१ मे (जिमाका) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची मे २०२५ मधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून,भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी.असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत श्रद्धेने केली जाणारी पूजा असून, तिच्या नोंदणीसाठी http://shrituljabhavanitempletrust.org या अधिकृत संकेतस्थळावर ‘सिंहासन पूजा पास बुकिंग’ या मेन्यूवर क्लिक करून, https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.नोंदणीची वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
नोंदणी कालावधी : २१ मे २०२५ सकाळी १० वाजता ते २६ मे २०२५ सकाळी १० वाजेपर्यंत.प्रथम सोडत: २७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता SMS द्वारे कळविण्यात येईल.प्रथम फेरीचे पेमेंट: २७ मे सकाळी १०.३० ते २८ मे सकाळी १० वाजेपर्यंत राहील.
व्दितीय सोडत (आवश्यकतेनुसार) : २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता. व्दितीय फेरीचे पेमेंट : २८ मे सकाळी १०.३० ते २९ मे सकाळी १० वाजेपर्यंत.तृतीय सोडत (उर्वरित असल्यास) २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता.तृतीय फेरीचे पेमेंट : २९ मे सकाळी १०.३० ते ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत.अंतीम यादी प्रसिद्धी: ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे.
सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी आणि नागरिकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पूजेच्या नोंदणीची माहिती लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.