धाराशिव | ११ मे २०२४
भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी जिल्हा प्रशासन व मा. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी नाका मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती.
मात्र, भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील ताज्या घडामोडी व संभाव्य सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा व तालुका स्तरावरील रॅली रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने घेण्यात आला असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच सहभागी संस्था व अधिकारी यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, पुढील सूचना प्रशासनामार्फत वेळोवेळी दिल्या जातील.
या निर्णयाची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी प्रसिद्धीस दिली.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
















