धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय गंगाधर शिंगाडे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कराड येथे आयोजित 31व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
गेल्या तीस वर्षांपासून धनंजय शिंगाडे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी विविध औद्योगिक संस्थांची स्थापना करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी 30 पेक्षा अधिक संस्था उभारल्या आहेत, ज्या यशस्वीपणे कार्यरत आहेत.
या पुरस्कार सोहळ्याला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, लोकशाही न्यूज चॅनेलचे विशाल पाटील,शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रवीण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शिंगाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी झी 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी विश्वस्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ज्ञानेश्वर पतंगे, पत्रकार सुधीर पवार, संतोष वतने, अनिरुद्ध कावळे, शंकर अंगरखे, प्रवीण पौळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धनंजय शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या या व्यापक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने त्यांना या पुरस्काराने गौरवले आहे.
- अतिवृष्टी असो वा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले राणादादा!
- तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’ शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
- आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- दुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा! – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणी
- एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
- कचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा!
- ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद
- सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विज कपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
- कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी
- जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! 2026
- शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील
- ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी
- प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ,ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान
– आमदार राणाजगजितसिंह पाटील













