धाराशिव जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ड्रोनसह हवेत उडणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी; ‘नो फ्लायिंग झोन’ जाहीर

Spread the love

धाराशिव ( खादिम सय्यद ) – धाराशिव जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ‘नो फ्लायिंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार हा आदेश निर्गमित केला आहे.

भारतीय लष्कराने अलीकडेच ऑपरेशन “सिंदुर” अंतर्गत जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तोयबा (LET) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचा बदला घेण्यासाठी संबंधित दहशतवादी संघटनांकडून राज्यात ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी याबाबतचा अहवाल सादर करत जिल्हा प्रशासनाला सजग राहण्याची सूचना केली होती.

त्याअनुषंगाने जिल्ह्यात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर्स, हँग ग्लायडर्स, हॉट एअर बलून व तत्सम कोणतीही हवेत उडणारी उपकरणे उडवण्यावर ३ जून २०२५ पर्यंत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रसारमाध्यमे, विवाह समारंभ, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आदी ठिकाणी होणारे ड्रोन वापरही समाविष्ट आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा संघटनांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही धाराशिव पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!