
सोलापूर : शहरातील एस.टी. मुख्य बस स्थानकावरून दि. १६ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी हरवली असल्याची माहिती समोर आली आहे. ईश्वरी शिंदे असे या हरवलेल्या मुलीचे नाव असून ती रानमसले, तालुका मोहोळ येथील रहिवासी आहे.
ईश्वरी शिंदे ही कोणालाही काहीही न सांगता एस.टी. बस स्थानक परिसरातून अचानक गायब झाली आहे. तिचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांनी शहरातील विविध भागात धावपळ सुरू केली आहे.
ईश्वरी शिंदे हिचा रंग गोरा असून उंची मध्यम आहे. हरवताना तिने कोणते कपडे परिधान केले होते याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोणी नागरिकांना ही मुलगी दिसल्यास कृपया खालील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा :
मोबाईल : ८०८७४७०७०७
सदर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून एका कुटुंबाला त्यांची हरवलेली मुलगी परत मिळवण्यासाठी मदतीचा हात द्या, असे आवाहन करण्यात येत आहे.