धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दि 5 मे रोजी निवेदन देण्यात आले असून, तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नागरिकांनी अनेक वेळा स्वच्छता निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एकच सफाई कर्मचारी संपूर्ण परिसरात पाठवून ‘काम झाले’ असे सांगितले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. “स्वच्छता ही मूलभूत सेवा असून ती रोज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
रोज नियमित घंटागाडी सेवा सुरु करावी, नाल्यांची व परिसराची नियमित साफसफाई करावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत ह्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.
“जर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर आमच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर साखीब सय्यद, महेबुब कुरेशी, जिशान सय्यद, पठाण मारुफ, आजम पठाण , नवाज कुरेशी, आसिफ कादरी , शेख आसेफ , मोमीन अली , गौस कुरेशी, टकारी जमीर , यांच्यासह अनेक नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा


















