तुळजापूर (प्रतिनिधी) — तुळजापूर तालुक्यातील मसला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी दुपारी सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबुराव गायकवाड यांच्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या निखिल बाबुराव गायकवाड (वय 28) या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात निखिल गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास निखिल गायकवाड हे शेतात गवत कापत असताना गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या अंगावर झडप घातली. झटापटीदरम्यान निखिल यांनी धाडसाने प्रतिकार केल्याने बिबट्या काही वेळातच पळून गेला. मात्र या हल्ल्यात निखिल यांच्या डाव्या हाताला व पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या वडिलांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सुदैवाने निखिल यांचा जीव वाचला असला, तरी बिबट्या गावाच्या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन परिसरात पथक तैनात करावं व बिबट्याला त्वरित पकडण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
(अंतरसंवाद न्यूज )
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा


















