उमरगा : जिल्हा समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचे समान वाटप करावे. कामांचे वाटप करताना जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला. आमदार सत्ताधारी पक्षाचे नसल्यामुळे निधीचे वाटप करताना उमरगा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, असे शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. २००९ पासून उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. युती असल्यामुळे भाजपला या मतदारसंघातून संधी मिळाली नाही.
राज्यात भाजपची सत्ता असूनही उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला आहे. शक्तीशाली आमदार बहुतांश निधी आपापल्या मतदारसंघांत नेतात. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघ वंचित राहू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसतानाही प्रामाणिकपणे, झोकून देऊन पक्षाचे काम करणारऱ्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. निधी आला तरच विकाकामे होतील, लोकांची सोय होईल. याचा पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ २०२९ मध्ये खुला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला या मतदारसंघातून संधी आहे. विकासकामांच्या बळावर भाजप तळागाळात पोहोचू शकेल. याचा विचार करून जुन्या, निष्ठांवत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, त्यांना बळ द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील















