आंदोलन :उबाठाच्या आयत्या पिठावर रेघोट्या , टक्केवारी विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण हे  पुराव्यानिशी जनतेसमोर आणणार -अमीत शिंदे

Spread the love

धाराशिव शहरातल्या डीपी रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत नगर विकास खात्याने काढलेला आदेश हा आमच्या आंदोलनाला आलेले यश असल्याचा खोटा दावा उबाठा गट करीत सुटला आहे. धूळफेक करण्यात ही मंडळी माहीर आहे. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंदाजित दरापेक्षा अधिकच्या दराच्या निविदांना मंजुरी न देता अंदाजपत्रकात नमूद केलेल्या दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने राज्यात सगळीकडे नगरविकास विभागाची कामे  करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ धाराशिव शहरापुरता असल्याचा कांगावा करण्यात उबाठा गट धन्यता मानून आंदोलनामुळेच हे यश आल्याचा खोटा दावा करीत सुटले असून त्यांचा दावा म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून आंदोलन टक्केवारीसाठी की जनतेसाठी केले लवकरच पुराव्यानिशी उघडकीस आणणार.

मुळात नगरोत्थान योजनेतंर्गत असलेली ही कामे राज्यातील अन्य शहरात जवळपास पूर्ण होत आली आहेत.आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव शहर नसताना जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठा पाठपुरावा करून या कामासाठी खास बाब निधी मंजूर करून घेतला आहे.तुम्ही मात्र यासाठी कांहीही न करता यात टक्केवारीसाठी  खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले.आपल्याच धाराशिव शहरातील या सर्व कामांना उशीर का झाला..? टक्केवारीसाठी यात कोणी कशा प्रकारे खोडा घातला..? जिल्ह्यात टक्केवारी वसुलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण आहेत ..? लवकरच  पुराव्यानिशी सगळा लेखाजोखा जनतेसमोर आपण आणणार आहोत. त्यानंतर डोळे झाकून दूध पिणारे मांजर कोण आहे? आणि कुणामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत याचा सगळा दस्तऐवज खुला करणार आहोत.

चांगल्या रस्त्याचे शहर म्हणून राज्यभर ओळख असलेले धाराशिव शहरातील रस्ते नावालाही शिल्लक राहिले नाहीत. टक्केवारीसाठी तुम्ही लादलेली भुयारी गटार योजना रस्त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. डोंगर दऱ्यावर वसलेल्या धाराशिव शहरात जरी अतिवृष्टी झाली तरी केवळ पाच मिनिटात सगळ्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होतो. असे असतानाही भुयारी गटार योजना का आणली..? यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा कोण हडप केला. भुयारी गटार योजनेतून कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले हे पुराव्यानिशी सांगण्याची वेळ आता आली आहे. भुयारी गटारीतून कोणी-कोणी स्वतःचे हात धुवून घेतले याची देखील आम्ही सविस्तर पोलखोल करणार आहोत. आंदोलनाचे स्टंट करून पाच वर्षात केलेलय भ्रष्ट कारभारावर आणि स्वतःच्या पापावर पांघरूण पडेल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा

बुरखा आम्ही फाडला असून तुमचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर  आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!