धाराशिव, दि. १ मे –
मध्य रेल्वे व्हॉलीबॉल खेळाडू संघटना, सोलापूरतर्फे ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्राप्त भारतीय रेल्वेचे माजी व्हॉलीबॉलपटू व प्रशिक्षक श्री. रशीद अहमद बागबान (निवृत्त चीफ तिकीट निरीक्षक, मध्य रेल्वे सोलापूर) यांची कन्या आणि जिल्हा परिषद प्रशाला, ढोकी (ता. जि. धाराशिव) येथील आदर्श शिक्षिका श्रीमती तबस्सुम रशीद अहमद बागबान यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आज दि. १ मे रोजी धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण समारंभात पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत, खासदार ओम राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव उपस्थित होते.
या गौरवाने संपूर्ण बागबान कुटुंबाचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यप्रवास अधिक उजळला आहे. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, नवकल्पना आणि सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या तबस्सुम मॅडम यांच्या कार्याची ही योग्य दखल मानली जात आहे.
या वेळी अनेक मान्यवर, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भव्य व प्रेरणादायी ठरले.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!

- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव

- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ

- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे

- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर










