


तुळजापूर – लातूर महामार्गावरील काक्रंबा येथे बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाले आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी या कामासंदर्भात गंभीर अनियमितता समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रशासनाची फसवणूक करत बांधकामासाठी लागणारा मुरुम आजूबाजूच्या गावांमधून अवैधरित्या उत्खनन करून आणण्यास सुरुवात केली आहे. या मुरुम उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही शेतजमिनींचेही नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मुरुम उचलला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होत असून धूळधक्कड वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य कायदेशीर मार्गाने आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने उपलब्ध करून देण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
उड्डाणपूलाचे महत्त्व : औसा – तुळजापूर मार्गावर असलेल्या या उड्डाणपुलामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. मात्र हे काम जर नियमबाह्य पद्धतीने केले जात असेल, तर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!

- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव

- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ

- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे

- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप









