धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव : अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला

धाराशिव ता.18: राणा पाटील गेल्या दहा वर्षापासून तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत सत्तेत आहेत तरीही सभागृहात जनतेचे…

पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

(फोटो AI )Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जोरदार…

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासह मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेतील चर्चेदरम्यान आक्रमक भूमिका घेत…

कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक 

कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी…

तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला

तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला तुळजापूर : शहरातील जामा मस्जिद…

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ…

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडेपुण्यातील कचरा…

अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी 

अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी…

सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा 

सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी…

error: Content is protected !!