राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला

Spread the love

धाराशिव ता.18: राणा पाटील गेल्या दहा वर्षापासून तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत सत्तेत आहेत तरीही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडलेले दिसत नाहीत. दुसरीकडे देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार ओमराजे निंबाळकर हे जनतेचे प्रश्न मांडत असून त्यावरही आता राणा पाटील यांच्या पोटात दुखत असल्याचे प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.
यावेळी गुरव म्हणाले की, या जिल्ह्यामध्ये जे काही होईल ते फक्त राणा पाटलाच्या मर्जीनेच व्हायला हवे अन्यथा ते होणार नाही अशीच मानसिकता भारतीय जनता पार्टीची व राणा पाटील यांची आहे. याच विकृत मानसिकतेचे दर्शन पुन्हा एकदा भाजपने दाखवला आहे. लोकसभेमध्ये खासदार ओम राजे निंबाळकर यांनी रेल्वे प्रश्न मांडून निधीची मागणी केली. त्यावर भाजपच्या वतीने व राणा पाटलाच्या सांगण्यावरून प्रतिक्रिया देण्यात आली. उलटपक्षी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरच खोडा घालण्याचा आरोप केला. खोडा घालण्याचा व स्थगिती देण्याचा व्यवसाय राणा पाटील यांचा आहे आणि ते सातत्याने करत असतात. जनतेच्या प्रति कोणत्याही प्रकारची बांधिलकी नसलेल्या राणा पाटील यांनी विकासावर बोलावं एवढी त्यांची नैतिकता नाही. तुमच्यावर लोकांचा एवढा विश्वास असता तर तुमच्या सौभाग्यवतींना तीन लाख 29 हजारने पराभवाचा सामना करावा लागला नसता. कशाच्याही कामाचे श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे हा अट्टाहास राणा पाटील करत आहेत. एखाद्या नवीन नवरा बायकोना मूल जन्माला घातलं तर त्याचंही उद्या राना पाटील श्रेय घेतील इतकी खालची पातळी त्यांनी गाठली आहे असंच त्यांच्या वर्तनावरून दिसत असल्याचं सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधीचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करण यामध्ये कोणी कितीही आडकाटी आणली तरी ओमराजे निंबाळकर हे जनतेच्या जीवावर राजकारण करतात. त्यांच्यासाठीच काम करतात त्यामुळे अशी कितीही कोल्हेकुही केली तरी त्याचा ओमराजेंवर कसलाही फरक पडणार नाही याची दक्षता राणा पाटील व त्यांच्या गड्यांनी घ्यावी असे आवाहन देखील सोमनाथ गुरव यांनी केले आहे.
राहिला प्रश्न रेल्वेच्या कामासंदर्भात तर 2014 ते 19 या काळात तुमचं सरकार खासदार देखील सत्ता पक्षातला असतानाही त्या काळात किती रुपयांचं काम झालं याचंही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते व राज्यात मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीसच होते मग तेव्हा तुमचे हात कुणी बांधले होते का असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटील यांना विचारला आहे.2019 ला ओमराजे खासदार झाल्यानंतरच हा प्रश्न सातत्याने अधिवेशनात तसेच वेळोवेळी रेल्वेमंत्री यांना अवगत करून त्याचा पाठपुरावा केला म्हणूनच आत्तापर्यंतच काम दिसत आहे. आपल्याशिवाय जगात कुणाला काही कळत नाही हा जो अविर्भाव आहे तो राणा पाटलांनी त्यांच्याजवळ ठेवावा. खासदार म्हणून ओमराजे यांना जनतेने निवडून दिलेल आहे आणि जनतेसाठी ते काम करतच राहणार आहेत. तुमच्या कितीही पोटात दुखले तरी तो तुमचा प्रश्न असल्याचे गुरव यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!