धाराशिव जिल्ह्यात जुगारविरोधी कारवाई; सहा ठिकाणी छापे, सहा आरोपींवर गुन्हे दाखल

Spread the love


धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार विविध पोलीस ठाण्यांनी जुगारविरोधी मोहिमेद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत सहा जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

धाराशिव शहर पोलीसांनी दि. 16 जून रोजी पाथरुड चौक येथे कारवाई करत इरफान इसमाईल शेख (रा. खॉजा नगर) याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व ₹1,150 रोख रक्कम जप्त केली.

येरमाळा पोलीसांनी 17 जून रोजी चोराखळी गावाजवळील रोडवर महेश दिलीप हाके (रा. येडशी) याच्यावर कारवाई केली असून ₹720 रक्कम जप्त करण्यात आली.

कळंब शहरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ अजीम पाशा बागवान (रा. केज रोड, कळंब) याच्याकडून ₹1,030 जप्त करण्यात आले.

नळदुर्ग पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत महेश महादेव बनसोडे (रा. बौद्ध नगर, नळदुर्ग) याच्याकडून ₹880 व कमलाकर अण्णाप्पा बिराजदार (रा. जळकोट) याच्याकडून ₹1,000 जप्त करून स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले.

धाराशिव ग्रामीण पोलीसांनी बावी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छापा टाकत विनोद भारत जाधव (रा. बावी) याच्याकडून ₹1,045 रक्कम जप्त केली.

सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!