दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी पकडले; धाराशिव येथून गावठी पिस्तूल, कोयता, चारचाकी व दुचाकी जप्त

Spread the love

धाराशिव (अंतरसंवाद न्यूज) –
धाराशिव जिल्ह्यात दरोड्याची तयारी करत असलेल्या तिघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून त्यांच्याकडून पिस्तूल, कोयता, चारचाकी व दुचाकींसह एकूण 5 लाख 5 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. 17 जून 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व सचिन खटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथक पेट्रोलिंग करत असताना धाराशिवमधील तेरणा कॉलेज परिसरात विमनातळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अंधारात काही संशयित इसम दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. लगेचच पथक घटनास्थळी गेले असता, दोन इसमे मोटरसायकलवरून पळून गेले, मात्र उरलेल्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.

अटकेत असलेले आरोपी:

1. धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी, वय 47, रा. बस्ती, उत्तर प्रदेश

2. निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण, वय 32, रा. काकानगर, धाराशिव

3. मुकेश शाम शिंदे, वय 24, रा. शिंगोली, धाराशिव

त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल:

गावठी बनावटीचे पिस्तूल (किंमत अंदाजे ₹75,000)

तीन जिवंत काडतुसे (₹600)

लोखंडी कोयता (₹200)

संट्रो कार (₹2,30,000)

बुलेट मोटरसायकल (₹1,55,000)

होंडा ॲक्टीवा स्कूटर (₹45,000)

एकूण जप्त मुद्देमाल: ₹5,05,800

याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेत असलेले तिन्ही आरोपी व मुद्देमाल ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कामगिरी पो.नि. विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, पोहेकॉ. महेबुब अरब, पोकॉ. विनायक दहीहांडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!