सोलापूर, दि. १२ मे (अंतरसंवाद न्यूज) – समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आणि आपल्या कार्यातून प्रेरणा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांना राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान २०२५ अंतर्गत आयोजित विभागीय मेळाव्यात हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू, उपक्रम प्रमुख महेश बडे, निरीक्षक मंगेश ठाकरे उपस्थित होते.
मयुर काकडे यांनी समाजातील वंचित, दुर्बल व विशेषतः दिव्यांग घटकांसाठी सातत्याने आवाज उठवत, प्रशासकीय पातळीवर प्रश्न मांडत लोकहिताचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पुरस्कार स्वीकृत करताना त्यांनी म्हटलं, “हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराला आणि माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो. मा. बच्चुभाऊंची प्रेरणा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे.”
सन्मानाच्या वेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी – बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, जमीर शेख, महेश माळी, महादेव चोपदार, संजय शिंदे, रवी शित्रे, संजय नाईकवाडी, दिनेश पोतदार, नवनाथ कचार, अनिल महबोले आदी उपस्थित होते.
मयुर काकडे : एक प्रेरणादायी सामाजिक योद्धा
जन्मतःच अपंगत्व असूनही आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर मयुर काकडे यांनी समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं आहे. वाघोली (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या खेड्यात १५ जून १९८५ रोजी जन्मलेले मयुर यांचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी.
राज्यशास्त्र व समाजशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी २०१० पासून दिव्यांगांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली. हजारो दिव्यांग व्यक्तींना मार्गदर्शन, मदत, हक्कांची जाणीव करून देत समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.
प्राप्त सन्मानांची झलक :
- महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार 2022
- सामाजिक न्याय विभागाचा सलग दिव्यांगरत्न पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचा दिव्यांग भूषण पुरस्कार
- दिव्यांग मतदार नोंदणी बाबत निवडणूक विभागाकडून गौरव
- अवेअरनेस ग्रुप, सक्षम पोलीस टाइम्स, शिवाश्रम प्रतिष्ठान, ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आदी संस्थांचे सन्मान
- प्रहार समाजरत्न, उत्कृष्ठ प्रतिनिधी व वीर महाराष्ट्र योद्धा पुरस्कार
- मराठवाडा युवा गौरव पुरस्कार 2023 – ज्ञानकिरण बहुउद्देशीय संस्थेचा सन्मान
अंतरसंवाद न्यूजकडून मयुर काकडे यांना मन:पूर्वक शुभेच्छा व सलाम!
– प्रतिनिधी, अंतरसंवाद न्यूज