धाराशिव : धाराशिव शहरातील मंजूर असलेल्या 140 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांची तात्काळ सुरूवात करावी तसेच शहरातील कचरा डेपो स्थलांतरित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडी धाराशिव शहराच्या वतीने उद्या सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी दुपारी बरोबर 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडी धाराशिव शहराच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील विविध मुख्य ठिकाणी यासंदर्भात बॅनरही लावण्यात आले आहेत.
याआधीही धाराशिव शहरातील कचरा डेपो हटवण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. तसेच 140 कोटी रुपयांच्या कामांना गती देण्यासाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत.
शहरातील कचरा डेपोच्या संदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाला उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण

- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती

- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..

- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले

- शिंगोली आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

- आळणी येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात

- धाराशिव : दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार?

- शिवसेना (उबाठा) गटाला चिलवडीत मोठे खिंडार; माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

- कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश

- धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल











