मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद , शाळा ,महाविद्यालयांत “अँटी नार्कोटिक्स क्लब” स्थापन होणार : ‘मित्र’ चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

धाराशिव:

आपल्या राज्य सरकारने अंमली पदार्थाबाबत ‘झिरो टॉलरन्सचे’ धोरण अंमलात आणण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी राज्यभरातील शाळा,महाविद्यालयात “अँटी नार्कोटिक्स क्लब” स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. आदरणीय फडणवीस साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये “अँटी नार्कोटिक्स क्लब” सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच सूचित केले आहे. जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही त्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्राप्त सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन जिल्हा प्रशासनही याबाबत आता तत्परतेने योग्य ती पाऊले उचलत असून लवकरच याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील तरुण पिढीला या गंभीर संकटातून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी मोठी मोहीम उघडली आहे.तरुण पिढीमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण पाहता याला वेळीच पायबंद घालण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महाविद्यालयामध्ये ‘अँटी नार्कोटिक्स क्लब’ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील आपण केवळ ड्रग्ज नव्हे तर इतर सिगारेट, मद्य यासारख्या विविध घातक व्यसनांच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तुळजापूर मतदारसंघातील महाविद्यालयात  ‘अंमली पदार्थ विरोधी क्लब’ स्थापन करण्याच्या अनुषंगाने ६  एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी धाराशिव, तहसीलदार तुळजापूर, पोलीस  उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक व चार महाविद्यालयांच्या प्रचार्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत पोलीस प्रशासन व पालकांनाही सोबत घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात  ‘अँटी नार्कोटिक्स क्लब’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याच  धर्तीवर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात  ‘अँटी नार्कोटिक्स क्लब’ स्थापन’ करण्याच्या अनुषंगाने  जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

आपल्या सरकारने अंमली पदार्थाबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण अंमलात आणण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी राज्यभरातील शाळा,महाविद्यालयात  अँटी नार्कोटिक्स क्लब स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.तरुण पिढी अंमली पदार्थांचे सेवनासह सिगारेट, मद्य यासारख्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला यापासून वाचवण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त कृती असणार आहे.त्यामुळे प्रशासनासोबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील यात सहभागी नोंदवावा.धाराशिव जिल्ह्यातील काही भागात अंमली पदार्थांची तस्करी व सेवनाचे प्रकार समोर आले आहेत. नागरिकाांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे हे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे गृह विभागाला कारवाई करताना सहकार्य झाले.यापुढील काळात देखील आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडत असतील तर तातडीने माहिती द्यावी.ड्रग्ज तस्करी, ड्रग्ज सेवनाची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासनही आ.पाटील यांनी यावेळी दिले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!