धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Spread the love


धाराशिव : शहरातील गाजी मैदान येथे आज, १९ एप्रिल रोजी हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.
गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह सोप्या आणि सन्मानपूर्वक पद्धतीने व्हावेत, या उद्देशाने हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी कडून गेल्या १८ वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या कालावधीत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून तब्बल ६५८ जोडप्यांचे संसार थाटण्यात आले आहेत.


हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी च्या वतीने नवदांपत्यांना संसारोपयोगी वस्तू, वर-वधू पोशाख तसेच वऱ्हाडींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न थांबू नये, यासाठी हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी मधील सदस्यांकडून हा उपक्रम राबवत मदत केली जाते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!