धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

Spread the love


धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

धाराशिव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालय येथे वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील व वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस भालेराव यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभावी वक्तृत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी “वक्ता कसा असावा, प्रभावी संवाद कसा साधावा आणि समाजापर्यंत विचार प्रभावीपणे कसे पोहोचवावेत” याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना सार्वजनिक जीवनात संवाद कौशल्य विकसित करण्याची दिशा मिळाली.

कार्यक्रमाला जीवनरावजी गोरे साहेब, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, बाळासाहेब कसले (लीगल जिल्हाध्यक्ष), ॲड. अविनाश जाधव, प्रा. जालिंदर पोळ (शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष), ॲड. योगेश सोन्नेपाटील, नगरसेवक पंकज भोसले, सुनील आंबेकर, नरसिंह मेटकरी, अभियंता सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवले, ॲड. बाळासाहेब आवड, जिंक्राईल पटेल, चेतन वाघमारे, गोपाळ टेकळे, किरण रोकडे, प्रा. तूरूप सर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बांधव देखील उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरामुळे युवकांमध्ये प्रभावी वक्तृत्व कौशल्य विकसित होऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!