धाराशिव जिल्ह्यातील बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना १४ हजार ३२ राख्या

Spread the love

धाराशिव जिल्ह्यातील बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना १४ हजार ३२ राख्या

धाराशिव – रक्षाबंधनाचा सण म्हणजे बंधुभाव, स्नेह आणि नात्यांची नवी उब. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील बहिणींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आपुलकी व्यक्त करत त्यांना राख्या व भावनिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्र पाठवली आहेत. महिलांच्या या उपक्रमांमुळे मुख्यमंत्री फडणवीस या बहिणींसाठी एक आधारस्तंभ ठरले असून हेच या अनोख्या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील महिलांनी तब्बल १९ मंडळांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून तब्बल १४ हजार ३२ राख्या भाजपा कार्यालयाकडे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रचलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक राहिला नाही, तर बहिणींच्या भावनांना आवाज देणारा एक सामाजिक संदेश ठरला. महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बहिणींनी या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. महिलांसाठीचे विविध शासकीय निर्णय, योजनांची अंमलबजावणी व थेट लाभ समाजातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचत असल्याचे मत महिलांनी या पत्रातून मांडले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील बहिणींनी केवळ एक राखी पाठवली नाही, तर आपल्या मनातील प्रेम, विश्वास आणि अपेक्षा देखील मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे हा उपक्रम जिल्हाभरातील भावनांना एकत्र आणणारा आणि महिलांच्या सामाजिक जागरूकतेचा द्योतक ठरला आहे. या कार्यक्रमावेळी नितीन काळे, शहराध्यक्ष अमित शिंदे, ॲड. अनिल काळे, ॲड. नितीन भोसले, रोहित देशमुख, नंदा पुनगडे, आशा लांडगे, रंजना राठोड, उषा सर्जे, मनिषा केंद्रे, अंजली बेताळे, रेणुका इंगोले, निशिगंधा पाटील, विद्या माने, सीमा वाकुरे,  सीमा सरडे, उज्वला पाटील, दीपाली देवारे, वनिता कोटाळे,  छाया बोंदर, आरती गिरी, भागश्री कुंभार, सोनाली सातपुते, जान्हवी पत्की यांची उपस्थिती होती


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!