तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा तीन महिन्यांचा कार्य अहवाल पक्षाकडे केला सादर

Spread the love

तुळजापूर :शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी नुकताच आपला पहिला तीन महिन्यांचा कार्य अहवाल धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्याकडे सादर केला. तालुकाप्रमुख पदाची धुरा तीन महिन्यांपूर्वी स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच अनेक सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश घडवून पक्षश्रेष्ठीसमोर एक वेगळी छाप निर्माण केली होती.

मागील तीन महिन्यांत त्यांनी तालुकाभर घेतलेली कार्यकर्त्यांची भेटीगाठी, केलेले संघटनात्मक उपक्रम व पक्षवाढीसाठी राबवलेले प्रयत्न याचे सविस्तर वर्णन या अहवालात करण्यात आले. भक्कम कार्य अहवाल पाहिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी जाधव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत कौतुक केले.

सदर कार्य अहवाल हा अमोल जाधव यांच्या तालुकाप्रमुख कार्यकाळातील पहिला अहवाल असून, तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामगिरीवर समाधानी होत भविष्यात त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत दिले आहेत.

कार्य अहवाल सादर करताना तुळजापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमोल जाधव म्हणाले, “ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात अधिक जोमाने लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. तालुक्यात शिवसेना पक्ष प्रथम क्रमांकावर यावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्षश्रेष्ठी अमोल जाधव यांना कोणती नवी जबाबदारी देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!