धाराशिव
शिंगोली (प्रतिनिधी) | शिंगोली येथील माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळांमध्ये हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा कांबळे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नेश्वर धुमाळ तर प्रमुख उपस्थितीत विशाल राठोड, इरफान शेख, विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अध्यक्ष सुरेखा कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वसंतराव नाईक यांनी शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसाय करत राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकरी, मजूर, ऊसतोड कामगार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करून शिक्षणाच्या माध्यमातून समाज uplift केला.
प्रमुख पाहुणे रत्नेश्वर धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वसंतराव नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही डॉक्टर, वकील, तहसीलदार, कलेक्टर, इंजिनिअर, खेळाडू, व्यापारी बनून देशाच्या विकासात योगदान द्यावे.
विशाल राठोड सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन वसंतराव नाईक यांनी भारताला हरितक्रांती दिली, तसेच मुख्यमंत्री पद भूषवून आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांनी डोळ्यात तेल घालून अभ्यास करून यशस्वी व्हावे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रत्नाकर पाटील सर यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्रकांत जाधव, दीपक खबोले, प्रशांत राठोड, सुधीर कांबळे, शेषेराव राठोड, मल्लिनाथ कोणदे, कैलास शानिमे, सचिन राठोड, वसतीगृह अधिक्षिका वैशाली शितोळे, ज्योती साने, ज्योती राठोड, बालीका बोयणे, गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, रेवा चव्हाण, सचिन अनंतकळवास, अविनाश घोडके, लिंगा आडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार खंडू पडवळ यांनी मानले.