आषाढी एकादशी निमित्त एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Spread the love


पंढरपूर, १ जुलै (अंतरसंवाद न्यूज):
श्री. क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आले असून, एसटीचे ५२०० बसचालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी मोफत चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले, “विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी वर्षानुवर्षे निःस्वार्थ भावनेने कार्यरत असतात. त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. त्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वखर्चाने तीन दिवस मोफत उपवासाचे भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ‘विठुरायाची सेवा’ करण्याची संधी मिळते हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. हे पुण्य पैशांत मोजता येत नाही आणि म्हणूनच दरवर्षी हा उपक्रम राबवणार आहे.”

५, ६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा, भिमा, विठ्ठल व पांडुरंग या बसस्थानकांवर एसटीच्या सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांना या मोफत भोजन योजनेचा लाभ मिळणार आहे.

भाविकांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा उपक्रम एक सामाजिक बांधिलकीचं उदाहरण ठरत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!