धाराशिव शहरात 1 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांत समाधानाची लाट

Spread the love

धाराशिव शहरातील विविध भागातील नागरी अडचणी लक्षात घेता 1 कोटी रूपयांच्या विकासकामांची मंजुरी मिळवून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या प्रयत्नातून आज (दि. 26 जून) सकाळी जुने राम मंदिर भाजी मंडई परिसरात या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाकडून ही कामे मंजूर झाली असून, त्यासाठी सुरज साळुंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्था, पथदिवे बसविणे व पाणीपुरवठा सुधारणे यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे.

कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांमधून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर –

शिवसेना शहरप्रमुख आकाश कोकाटे, शिवउद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील (आप्पा) शेरखाने, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, महिला आघाडी जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, तसेच संतोष कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, नागेश जगदाळे, विलास लोकरे, अ‍ॅड. अजित दानवे, मोनू खळदकर, संकेत मुंडे, अंबादास दानवे, महेश खळदकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि युवक उपस्थित होते.

 अंततः या विकासकामांमुळे धाराशिव शहरात मूलभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासास चालना मिळणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!