धाराशिव – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री साई जनविकास औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे अनन्य साधारण महत्व असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी त्या अनुषंगाने आयटीआय मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशक यांनी सहभाग घेतला.