धाराशिव : आज दिनांक २३ जून २०२५ रोजी, शिंगोली (ता. धाराशिव) येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या “एक पेड मॉं के नाम” या अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी लावलेली आंबा, नारळ व फुलांची झाडे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी रत्नाकर पाटील सर व खंडू पडवळ सर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक सतीश कुंभार, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, शिक्षक प्रशांत राठोड, चंद्रकांत जाधव, कैलास शानिमे, दिपक खबोल, सुधीर कांबळे, श्रीमती ज्योती साने, श्रीमती बालिका बोयणे, शेषेराव राठोड, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, इरफान शेख, ज्योती राठोड, श्रद्धा सूर्यवंशी, सचिन राठोड, आमदापूरे सर, सुरेखा कांबळे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, वसंत भिसे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजवली असून भविष्यात पर्यावरण पूरक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे.