चिंचपूर येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

Spread the love

प्रतिनिधी, भूम – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचपूर ढगे येथील आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे वही आणि पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत शाळेच्या परिसरात वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष अभय तांबे, उद्योजक अजित ढगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भगवान पाटील, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दत्ता तांबे,तानाजी ढगे,समीर ढगे,तानाजी विधाते,प्रमोद ढगे,अविनाश ढगे,गणेश ढगे,गोकुळ वराळे,हरिभाऊ अगावणे, रामदास विधाते,बाळू अंधारे,अतुल गोरे,बापूसाहेब कसबे, बापू माळी, समाधान मातणे,यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सतीश मातने यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक दत्तात्रय कालवटकर यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक रघुनाथ दैन यांनी मानले. यावेळी सहशिक्षक नितीन मस्तुद, श्रद्धा आसलकर आणि वैशाली घोडके यांचीही उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!